हुलल्डबाजी विना गौतमीचा वलखेडला डान्स कार्यक्रम संपन्न; प्रेक्षकांची भरभरून दाद...

हुलल्डबाजी विना गौतमीचा वलखेडला डान्स कार्यक्रम संपन्न;  प्रेक्षकांची भरभरून दाद...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

नृत्यांगना गौतमी पाटील आणि प्रेक्षकांची होणारी हुललड बाजी हे समीकरण ठरले असल्याने जेथे तेथे गौतमीचे कार्यक्रम होतात तेथे पोलीस  प्रशासनाची डोकेदुखी वाढते. मात्र दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गणेश उत्सवानिमित्ताने बुधवार दि.२७ रोजी सायंकाळी येथील एकता कला व क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजकांच्या नियोजनामुळे शांततेत व पावसामध्येही प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. मंडळाचे अध्यक्ष व सरपंच विनायक शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी  प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिस्त शांतता राखण्याचे आवाहन पोलिस व आयोजकांमार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये प्रथमतः मंचासमोर महिलांची व्यवस्था केली होती त्या पाठीमागे पुरुषांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय दिंडोरीचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.कार्यक्रम शांततेत पार पडल्याने आयोजकांनी प्रेक्षकांचे आभार मानले.