प्रमोशन निमित्त उमरखेड येथे संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या टीमची भेट...
![प्रमोशन निमित्त उमरखेड येथे संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या टीमची भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6652ba82af782.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
दि. 25 मे रोजी दुपारी ४:३० वा. संघर्षयोद्धा या चित्रपटातील मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख भूमिकेत असलेले; रोहन पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने उमरखेड येथील आरक्षण मदत केंद्र येथे भेट दिली.
यावेळी सरोजताई देशमुख जिल्हा ब्रिगेड अध्यक्ष यवतमाळ तसेच दिग्दर्शक आनंद बाबा शिंदे, सचिन घाडगे, बाबुराव वानखेडे, लोखंडे सर, प्रवीण सूर्यवंशी सर, पत्रकार किरण मुक्कावार हे उपस्थित होते. यावेळी रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कार्याबद्दल चित्रपट निर्मिती केली असून, त्याचा 21 जून रोजी प्रदर्शित होत आहे. सर्वांनी हा चित्रपट बघावा असे सांगितले आहे.