सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो - प्रियाताई देवसरकर
NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार
यवतमाळ : सावळेश्वर येथील आनंदीबाई माधवराव रावते विद्यालयात; झेप २०२३ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा प्रियाताई युवराज देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रियाताई म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.! शालेय विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त कलागुणांना सादरीकरणातून वाव मिळवून देण्याचे माध्यम म्हणजे क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम असे प्रतिपादन प्रिया देवसरकर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, निसर्ग प्रेम, स्वच्छता, दारूबंदी, हुंडाबंदी, अंधश्रद्धा, राष्ट्रभक्ती, स्त्री पुरुष समानता यावर आधारित गीत, नृत्य, नाटिका सादर करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावळेश्वरच्या सरपंचा अर्चना रावते, युवराज पाटील देवसरकर, उपसरपंचा पूजाबाई काळबांडे, पोलीस पाटील अनिल कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळबांडे, सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव रावते, माजी सरपंच बालाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश काळबांडे, अनिता रावते, पल्लवी रावते, ध्रुपदाबाई काळबांडे, निकिता रावते, भाग्यरथाबाई काळबांडे, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक कोंडबाराव काटे, ग्रामसेवक अनिल गाडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद मुनेश्वर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी शाळेची स्थापना, उद्दिष्ट, उपलब्ध सुविधा, शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती व त्यांनी संपादन केलेले यश याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दीपक चंद्रे तर आभार बाळासाहेब देवसरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामराव पवार, गौतम वाठोरे, सचिन माने, वैभव रोकडे, सुभाष काळकर, दत्तात्रय धोंगडे, व्यंकटेश गुडटवार, विष्णू चव्हाण यांनी परिश्रम घेतले.