भनवड आश्रमशाळेत क्रीडामहोत्सव...
![भनवड आश्रमशाळेत क्रीडामहोत्सव...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a934cc076b9.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हान, नाशिक
कर्म.रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था राजारामनगर ता. दिंडोरी संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भनवड ता. दिंडोरी येथे शालेय स्थरावर "क्रिडा महोत्सव २०२३_२४" या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धचे आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.
शाळेचे एकूण ४८०विध्यार्थ्यासाठी त्यामध्ये कब्बडी, रस्सीखेच, क्रिकेट, खो -खो, संगीत खुर्ची असे सांघिक व गोळाफेक, धावणे, लंगडी, दोरउडी, तीन पायी शर्यत अशा वैयक्तिक स्पर्धा असणार आहे.
उदघाट्न प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी जेष्ठ संचालक रामदास पिंगळ, संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संचालक दिनकरराव जाधव, निंबा देशमुख, नामदेव घडवजे, दादासाहेब पाटील, राजेंद्र गांगुर्डे तसेच भनवड गावचे सरपंच कचरू गायकवाड, पवार बाबा व पांडुरंग खांडवी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे शाल, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना "विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व समजून नैपुण्य गाठले पाहिजे" असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमंवशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक जी.एल.भुसाळ यांनी शाळा व क्रीडाविषयी प्रास्तविक करण्यात आले. क्रीडाप्रमुख सचिन रणदिवे यांनी विद्यार्थ्यांचे संचलन केले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक बी.पी.जाधव यांनी केले. याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक दिगंबर गायकवाड गायकवाड, दिलीप शिंगाडे, महेश पवार, सखाराम सोनवणे, शाम जाधव, संदीप धारराव, बापू मार्कंड, राजू झिरवाळ, प्रणिता आहेर, रेश्मा चंदन, योगेश ततार, संगीता गवळी बाळासाहेब उगले तसेच कर्मचारी ज्ञानेश्वर कावळे, अनिल भोये, लहू बकरे, बुवा, डोखळे, गांगोडे, भवर, वाघ मॅडम, यशवंत जाधव, सोमनाथ गटकळ हे उपस्थित होते.