उमरखेड येथे सिद्धेश्वर मित्र मंडळाच्यावतीने मानाची दहीहंडी उत्सव साजरा
![उमरखेड येथे सिद्धेश्वर मित्र मंडळाच्यावतीने मानाची दहीहंडी उत्सव साजरा](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_64fbe8a89e455.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
उमरखेड शहरात मागील शंभर वर्षांपासून पारंपारिक दहीहंडी उत्सव; सिद्धेश्वर युवक मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येतो. याही वर्षी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम येथील महाराष्ट्र बँकेच्या समोरील मैदानात उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडीचे उद्घाटन काँग्रेसचे युवा नेते गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या दहीहंडी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ मैड, कविता मारोडकर ,अजय नरवाडे, सुजीत बंग, दत्तात्रय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळपासूनच या दहीहंडीसाठी वरून राजाने सुद्धा हजेरी लावली होती. त्यामुळे दहीहंडीची मजा काही अलगच आली. त्यातच डीजेचा आवाज घुमू लागला अशा या नैसर्गिक वातावरणात दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला.
या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल मैड, सिद्धेश्वर जगताप, अनिल ठाकरे, सनी गायकवाड, करण रुडे, सुनील चोरघडे , विनोद मैड यांनी केले होते. विविध ठिकाणावरून गोविंदा दहीहंडीसाठी सहभागी झाले होते. यावर्षीचे पारितोषिक सिद्धेश्वर मंडळाने पटकावले आहे.