श्रीराम शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त "कादवा" वर सर्व रोग निदान शिबिर...

श्रीराम शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त "कादवा" वर सर्व रोग निदान शिबिर...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : कादवा कारखान्याचे चेअरमन  श्रीराम शेटे यांचा 5 डिसेंबर रोजी 77 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कादवा सहकारी साखर कारखाना येथे म.वि.प्र. च्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, आडगाव यांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील जनतेसाठी तसेच कादवा ऊसतोड कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी, कादवा परिवारासाठी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

त्यामध्ये ई.सी.जी. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासणी, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, बालरोग ह्या क्षेत्रातील तज्ञ तपासणीसाठी येणार आहेत.

असमानी, सुलतानी व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी राजा हतबल झालेला आहे. त्यामुळे श्री. श्रीराम शेटे यांचा वाढदिवस सोहळा होणार नाही. कोणीही वाढदिवसप्रसंगी पुष्पगुच्छे, शाल व श्रीफळ न आणता; ऊसतोड मजुर कामगार व शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू भेट स्वरूपात दिल्यास त्याचा उपयोग ऊस तोड मजुर व शालेय विद्यार्थ्यांना होईल. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन कादवाचे संचालक मंडळ, अधिकारी, कामगार युनियन व कामगार बांधवाच्यावतीने करण्यात येत आहे.