पालक आणि पोटची मुलं यात कुठे तरी दुरावा निर्माण होतोय का? पालकांनो डोळे उघडा आपली मुलं सुरक्षित आहेत का?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सध्या पालक आणि पोटची मुलं यात कुठे तरी दुरावा निर्माण होत चालला कि काय? अशीच काहीशी परिस्थिती आत्ताच्या काही घडलेल्या घटनाच्यामधून समोर आला आहे. आता मुलं शाळेत, विद्यालयात, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षित आहेत असे वाटतं नाही.

काल परवाच चाकण परिसरातील एका नामांकित विद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीं यांनी शिक्षकांनी बेदम मारहाण करणे, विद्यार्थीनी यांना चुकीच्या ठिकाणी स्पर्श करणे, चिमटे काढणे, घरी कुणी नसताना व्हिडिओ कॉल करणे आदी घटना घडत असल्याच्या लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. यावर एका विद्यार्थिनीने धाडस करून स्वतःच्या आईला घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला असता तिने तिलाच उलट तपासणी करून गप्प बसवले. तर ज्या विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणे, तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला नापास करतो, विद्यार्थ्यांना तुमचे दाखले घेऊन जा अशा पद्धतीने मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार या विद्यालयातून समोर आले आहे. यावर मात्र कोणत्या तरी भीती पोटी पालक गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत. याचे महत्वाचे एकच कारण आहे ते म्हणजे पालक आणि मुलं यांच्यातील संवाद पाहिजे तसा होताना दिसत नाही. जो मुलांचा संवाद होतो तो आईशी पण ती आई अन्याय झाला तरी चालेल पण बाहेर वाच्च्याता नको म्हणून गप्प बसण्याची भूमिका घेताना दिसत आहे.
यामुळे दोन दिवसापूर्वी खेड तालुक्यातील एका ४२ वर्षीय नराधमाणे शेजारील ९ वर्षाच्या चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार केला. पण ज्यावेळी त्या मुलीची आई फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली त्यावेळी आईने सारवा सारव करत मुलगी घरून नाही तर शाळेतून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाहेर नेवून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवताना दिली. पण सत्य घटना म्हणजे त्या मुलीचे आई वडील दोन दमडीच्या पैशासाठी त्यामुलीला त्या ४२ वर्षीय नराधमासोबत पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा वेळी त्या चिमुकलीच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. यावरून हाच मुद्दा उपस्थित होतो कि, खरंच पालकांनो आपले आपल्या पोटच्या मुलांच्याकडे लक्ष आहे का? आपण त्यांच्याशी संवाद साधतो का? आपल्या मुलांची रोजची मानसिकता आपल्याला कळते का? अशा एक ना अनेक गोष्टीकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे.
जर पालक म्हणून आपण या गोष्टीकडे समजुनही आणि मुलांनी सांगूनही दुर्लक्ष करत असू तर (विशेष आई) आपण खरंच २१ व्या शतकातील पालक म्हणण्यास पात्र आहोत का? याचेही आत्मपरीक्षण पालक नावाने करायलाच हवे. तुमच्या एका दुर्लक्षामुळे आपल्या मुलीचे शोषण, अत्याचार, मुलामध्ये क्रूरता, व्यसनता, गुन्हेगारी हे दुर्गुण रुजू शकतात. त्याचा परिणाम नक्कीच कालांतराने पालक या शब्दावर झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या मुलांच्या दुर्लक्षणामुळे क्रूरता करणारे निर्धावून आपल्या मुला सारख्या अजूनही बऱ्याच मुलांचा बळी घेतात तरीही आपण डोळे झाकून अन्याय सहनच करत असू तर हे आपल्या पालक शब्दाला अशोभनीय आहे.
यानंतर विषय येतो तो मुलांच्या जीवनातील दुसऱ्या पालकाचा तो म्हणजे मुलांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा. आपले सर्वांचे जे काही भविष्य, उत्कर्ष आहे त्यात आई वडिलांच्या बरोबर तितकासा शिक्षकांचाही वाटा आहे हे नाकारता कामा नये. पण काही प्रामाणिक शिक्षक सोडले तर बरेच शिक्षक यांच्यातही मोठी क्रूरता भरल्याचे सध्यानंतरीच्या घटनाच्या मधून समोर आले आहे. या लेखाच्या सुरुवातीला जे उदाहरणे दिली आहेत ती एका प्रतिष्ठित विद्यालयात झालेल्या घटनाचे दाखले आहेत. तरीही काही तरी कारणे देऊन संस्था चालक देव नामाचा जप करून असे क्रूर काळे कारनामे झाकताना दिसत आहेत. यावर पालकांनी पुढे येऊन आवाज उठवायला हवा. नाहीतर दिल्लीच्या निर्भया सारख्या आपल्या परिसरातही निर्भयासारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील मुलावर अन्याय, अत्याचार, शोषण अशा गंभीर घटना घडत असतील तर त्यावर पालक या नात्याने आवाज उठवायला हवा. "अरे बापा तू मुडदा होऊ नको, तू एक एक अन्यायाचा धागा हो" पोटच्या मुलांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा निखारा होशील तेव्हाच अशी क्रूर कृती करणारे यांना शासन होईल यात तिळमात्र शंका नाही.
ज्यांना मुले आपला पालक समजतात, गुरु समजतात अशा काही बेशरम शिक्षकांच्याकडून मुलांच्या बद्दल असे क्रूर कृत्य घडत असतील तर, यावर पालकांनी पुढे येऊन आवाज उठवायलाच हवा. नाहीतर आपल्या मुलाचे भविष्य हे अंधारामय झाल्याशिवाय राहणार नाही. अशा अडचणीत कुणी विद्यार्थी, विद्यार्थिनीं, महाविद्यालयीन तरुण - तरुणी असतील तर त्यांनी निसंकोच News15 मराठी वाहिनीशी संपर्क साधावा. तुमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी News15 मराठी तत्पर राहील. कारण प्रश्न मुलांच्या भविष्याचा अन पालकांच्या जागृतीचा आहे.
निर्भीडता हिच आमची ओळख... News15 मराठी