"व्हॉइस ऑफ मिडिया'ची" हिंगोली जिल्हा कार्यकारणी जाहीर...
!["व्हॉइस ऑफ मिडिया'ची" हिंगोली जिल्हा कार्यकारणी जाहीर...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_63afb3a004df4.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : नारायण काळे
हिंगोली : पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील "व्हॉइस ऑफ मीडिया" या पत्रकार संघटनेची हिंगोली जिल्हा कार्यकारणी घोषित झाली असून, जिल्हाध्यक्षपदी रमेश कदम यांची तर सरचिटणीस पदी रमेश चेंडके यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात दि. 30 डिसेंबर रोजी "व्हॉइस ऑफ मिडिया" या पत्रकार संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रमेश कदम तर मार्गदर्शक म्हणून विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकात रमेश कदम म्हणाले की.! "व्हॉइस ऑफ मीडिया" ही संघटना पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर काम करीत आहे. शिक्षण, आरोग्य तसेच गृहनिर्माण सोसायटी याशिवाय पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करीत आहे. राष्ट्रीय पातळीवर ही संघटना कार्यरत असून, या संघटनेमध्ये देशभरातील 18000 नामांकित संपादक, पत्रकार जोडल्या गेले आहेत. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी हिंगोली जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये कार्याध्यक्षपदी मंगेश शेवाळकर आणि सचिन कावडे, जिल्हा उपाध्यक्षपदी गजानन वाणी, शिवाजीराव देशमुख, सह सरचिटणीस संजय कापसे, विभागीय कार्यकारणी प्रतिनिधी विजय पाटील, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उंडाळ, कार्यवाहक शाम सोळंके, रमेश वाबळे, जिल्हा संघटक पदी गजानन लोंढे, नंदकुमार कांबळे, मनीष खरात, संजय बर्दापुरे, जिल्हा प्रवक्तापदी संजय कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रमुनी बलखंडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी राजेश दारव्हेकर, सुनील पाठक, यशवंत पराडकर, संतोष भिषे, श्रीधर वाळवंटे यांची निवड करण्यात आली.