माकणी - खरबवाडी साठवण तलावातील मगर वन अधिकाऱ्यांनी पकडली.! नागरीकांमध्ये समाधान...

माकणी - खरबवाडी साठवण तलावातील मगर वन अधिकाऱ्यांनी पकडली.! नागरीकांमध्ये समाधान...

NEWS15 प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील माकणी - खरबवाडी साठवन तलावात गेल्या वर्षापासून अढळून येत असलेली भयंकर मोठी मगर; आज अढळून आल्याने तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या सुचनेवरून अहमदपूर वन विभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ जावून ग्रामस्थांच्या सहकार्याने मगर पकडून घेवून गेले आहेत. यामुळे खरबवाडी - माकणी येथील सरपंच - ग्रामस्थांच्यावतीने वन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी शिरूर ताजबंदचे मंडळ अधिकारी  विशाल केंचे, तलाठी मुकूंद सुडके, खरबवाडी ग्रामसेवक रसाळ, वनरक्षक होनराव विश्वनाथ, वनरक्षकअंबुलगेकर चाकूर, वन अधिकारी अहमदपूर गोविंद माळी, रामेश्वर केसाळे, सुरेश मस्के, वनरक्षक अहमदपूर बि. एच . गडकर खरबवाडी सरपंच प्रविन जगताप, माकणीचे उपसरपंच भरत येरमे सह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे कर्मचारी मगर पकडून घेवून गेले. यामुळे नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.