खडकसुकेने येथे दि.४ रोजी म्हसोबा महाराज यात्राउत्सव...

खडकसुकेने येथे दि.४ रोजी म्हसोबा महाराज यात्राउत्सव...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेने येथे सालाबाद प्रमाणे रविवार दि. ४ रोजी म्हसोबा महाराज यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार असून, यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये सकाळी ७ ते ८ अभिषेक ९ ते ११ महापूजा दुपारी २ ते ४ रथ मिरवणूक व सायंकाळी ४ ते ७ कुस्त्या आदी कार्यक्रम होणार असून परिसरातील भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा अशी आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.