धरणांच्या तालुक्याला पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षा.! तालुक्यातील धरणांजवळ पक्षी झाले दुर्मिळ...

धरणांच्या तालुक्याला पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षा.! तालुक्यातील धरणांजवळ पक्षी झाले दुर्मिळ...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुका संपूर्ण जिल्ह्यात एक धरणांचा तालुका म्हणून नावारूपाला आहे.परंतु धरणांमध्ये मुबलक पाणी,निसर्गाची उत्तम साथ,विविध झाडे,वेली लतानी नटलेला भाग,द-या डोंगर यांची लाभलेली शोभा त्यामुळे हा भाग एकप्रकारे मनाला भुरळ पाडणारा भाग आहे.परंतु या निसर्गाने नटलेल्या भागात आजमितीस येथे पाहुण्या पक्ष्यांचे आगमन पाहायला न मिळाल्याने अनेक निसर्ग प्रेमी पर्यटकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.यांची खंत दिंडोरी तालुक्यातील जनतेला नेहमी वाटत आहे.

दिंंडोरी तालुक्यातील सर्वच धरणे मोठाली मानली जातात. त्यात वाघाड, करजंवण, ओझरखेड, पुणेगाव, पालखेड, तिसगाव ही धरणे प्रमुख आहे. पाणीसाठा सर्वच धरणांत ब-यापैकी उपलब्ध आहेत. परंतु या धरणांच्या आवतीभोवती नव-नवीन पाहुणे पक्षी कधीच नजरेस पाहायला मिळत नाही. याचे कारण काय? हा सवाल एकप्रकारे संशोधनांचा भाग ठरला आहे. या तालुक्यांच्या जवळच असणा-या निफाड तालुक्यातील नांदुरमध्येश्वर एक अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसात अनेक देशी विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर आगमन होत असते. परंतु या उलट दिंडोरी तालुक्यातील एकाही धरणांजवळ कोणत्याही पक्षाचे वास्तव्य पाहायला मिळत नाही. पक्षाच्या वास्तव्यासाठी येथील वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, पालखेड आणि करजंवण इ. ठिकाणी निसर्गाने नटलेला भुभाग उपलब्ध आहे. परंतु येथे दरवर्षीच्या हिवाळ्यात नवीन पाहुण्या पक्षाचे आगमन कधीच पाहायला मिळत नाही हे विशेष.! हिवाळ्यात व पावसाळ्यात दिंडोरीचा हा निसर्ग भाग पर्यटकांना न नेहमी मनमोहक, वाटत असल्यांने नेहमीच हा भाग गर्दीने फुललेला असतो. परंतु याठिकाणी पक्षी आपले वास्तव्य का करीत नाही. याबाबतीत अनेक तर्क वितर्क केले जात आहे. तसेच या भागात पक्ष्यांच्या वास्तव्यांसाठी चांगली निसर्ग साथ आहे. परंतु विविध पक्षी सोडा पण दशक्रियाच्या दिवशी कावळे सुध्दा लवकर येत नाही.

पक्षी का येत नाही?

तालुक्यातील धरणांजवळ पक्षी का येत नाही.तर याला त्याठिकाणची भौगोलिक पार्श्वभूमी हे मुळ कारण पुढे येते. त्यात गाळ, दलदल गाळ साठवण धरण पात्रांत उंचवटे, अशी भुरुपे असावी लागतात. तसेच पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शेवाळ, दलदलीतील कीटक, इ. येथे मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने येथे विविध पक्षी येण्यासाठी ना पसंती मिळते. या गोष्टीची शासकीय यंत्रणेतुन जर प्रयत्न केले गेले तर दिंडोरी तालुक्यातील धरणांजवळ विविध प्रकारच्या पाहुण्या पक्षीची हजेरी लागले व पक्षी अभयारण्य होण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यातील धरणांना एकप्रकारे भौगोलिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त होण्यास मदत होईल.