माजी विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी स्नेहमेळावा.! २० वर्षांनंतर जमले एकत्र...

माजी विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी स्नेहमेळावा.! २० वर्षांनंतर जमले एकत्र...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील २००७-०८ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.

शालेय जीवनातील सुख दुःख आठवणींना उजाळा देताच मित्रांमध्ये रंगलेली गप्पांची मैफल विविध खेळ खेळत बालपण अनुभवले एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करीत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत हा स्नेह मेळावा पार पडला. या मेळाव्याचे आयोजन रॉयल फार्मचे संचालक सागर चव्हाण यांनी केले होते.

प्रथमता विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. बोराडे व सागर चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. २० वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या या स्नेह मेळाव्यात एकमेकांबद्दल आदर व्यक्त करून समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकां प्रति असणारे प्रेम व्यक्त करून या शाळेला विद्यालयाला एलसीडी भेट देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सुलोचना गायकवाड या विद्यार्थिनीची विक्रीकर निरीक्षक मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने तसेच ललिता कांबळी ही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून तर मनीषा बदादे हिची सरकार वाडा पोलीस स्टेशन महिला कॉन्स्टेबल निर्भया व दामिनी पथक मध्ये कार्यरत असल्याने मुख्याध्यापक बोराडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राहुल जाधव, प्रदीप चव्हाण, संदीप गायकवाड, धनंजय गायकवाड, खंडू गाढवे, राहुल गायकवाड, विक्रम चारोस्कर, साजन कोकाटे, मनोज गायकवाड, फरीद शेख, सचिन कराटे, सागर पीठे आदिसह विद्यालयाचे श्रीमती देशमुख, श्रीमती गांगुर्डे, वाघ कैलास गुरुळे, तुषार मिठे, समाधान नेरपगार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.