मुलाच्या उपचारासाठी पैशाची केली मदत.! नंतर उपकाराची परतफेड म्हणून, विवाहित महिलेवर नराधमांकडून वारंवार अत्याचार...

मुलाच्या उपचारासाठी पैशाची केली मदत.! नंतर उपकाराची परतफेड म्हणून, विवाहित महिलेवर नराधमांकडून वारंवार अत्याचार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया

मुलाच्या उपचारासाठी पैश्याची मदत केली म्हणून, महिलेवर दबाव टाकून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील रावनवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. तर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपीना आणि शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका आरोपीला रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

गोंदिया जिल्हयाच्या रावनवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या; एका गावातील ४२ वर्षांच्या महिलेवर गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींने दवाब टाकून, आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रावणवाडी पोलिसांनी २ नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर तिसऱ्या आरोपीने शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यालाही पोलिसांनी अटक केले आहे.

आरोपी नराधमाने पीडितेच्या मुलाच्या उपचारांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये गावातीलच ४२ वर्षांच्या पीडित महिलेला आर्थिक मदत केली. त्याचा मोबदल्यात म्हणून दोन्ही आरोपी तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करायचे. यात ५० वर्षीय देवेंद्र मानकर, ४८ वर्षीय राजू मानकर यांचा समावेश आहे. हे दोन आरोपी कधी शेतात तर कधी घरी तिला फोन करून बोलावून तिच्यावर अत्याचार करायचे. तिने टाळण्याचे प्रयत्न केल्यास तिला फोनवर आरोपी धमकी द्यायचे त्यातच आरोपीने ९ ऑगस्ट २०२३ ला पीडितेला रात्री शेतातील उसाच्या वाडीत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार नेहमी पाहणारा सहकारी ५० वर्षीय आरोपी अशोक मरठे यानेही; पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर पिडीत महिलेने ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीवर रावणवाडी पोलिसांनी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला करीत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

adv