औसा तालुक्यातील किल्लारी येथे दुसरी धम्म परिषद उत्साहात संपन्न...

औसा तालुक्यातील किल्लारी येथे दुसरी धम्म परिषद उत्साहात संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी :  सुधाकर सूर्यवंशी

लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे तथागत गौतम बुध्दांची जन्मभूमी आहे. तसेच त्यांनी रूजविलेला धम्म.! पुनर्रजिवीत करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा असून, त्यामुळेचं जगभर  बौध्द धम्माची पाळेमुळे रूजून धम्मक्रांती झाली आहे. ही धम्मक्रांती अधिक गतीमान व्हावी अशी अपेक्षा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले.

किल्लारी येथील संघमित्रा व तक्षशिला बुद्धविहारात भन्ते धम्मसार यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  धम्मपरिषदेचे अध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्मपरिषदेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी भन्ते पय्यानंद, भन्ते धम्मशील, भन्ते महाविरो थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या काळात बौद्ध संस्कृती रूजवावी लागेल असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी भन्तेंनी धम्मदेसना दिली. धम्म परिषदेस लातूर, उस्मानाबाद, बीडसह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते.