किनगाव येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा...

किनगाव येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे,सरपंच सुमित्राबाई वाहूळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके,सपोनि भाऊसाहेब खंदारे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे,ग्रामपंचायत सदस्य निजाम कुरेशी,प्रकाश मुंडे, विष्णु आचार्य,सहदेव होनाळे,बालाजी मुंढे,संतोष कांबळे, धम्मानंद कांबळे,वैजनाथ मुंडे आदी जण उपस्थित होते.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे, उपाध्यक्ष असलम शेख,सचिव जाकेर कुरेशी,सहसचिव अन्वर बागवान, कार्यालय प्रमुख शेटीबा श्रंगारे,सदस्य रोकडोबा भुसाळे,सदस्य संजीवकुमार देवनाळे,कोषाध्यक्ष बालाजी आचार्य आदी जण उपस्थित होते.

तसेच किनगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक ६ जानेवारी रोजी पहिले मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिना निमित्ताने किनगाव भागातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील त्र्यंबक गुट्टे यांच्या कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, चंद्रप्रकाश हंगे,रतन सौदागर,बाळु फड,सायस गुट्टे,गोविंद गुट्टे,माऊली दहिफळे, दत्तू कातकडे आदी जण उपस्थित होते.तसेच येथील ग्रामपंचायतच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.