दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
मुख्यमंत्री यांच्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेच्या संचालिका शोभाताई बोरस्ते होत्या.
यावेळी मंचावर दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. कल्पनाताई गांगोडे, मोहाडी गोपालकृष्ण बचत गटाच्या अध्यक्षा सौ.राजश्री जाधव, अँड. रत्नाताई शेळके, नगरसेविका शैलाताई उफाडे, अरुणाताई देशमुख, प्रतिभा मापारी, सविता शिंदे, रावसाहेब उशीर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मविप्र संचालक सौ.शोभाताई बोरस्ते यांनी उपस्थित महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मुली व महिला यांनी कुटुंबात एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे व महिलांनी आपल्या जीवनात आपल्या कामासोबतच इतर कार्यक्रम व उपक्रमात सहभागी होऊन विचारांची देवाण घेवाण केल्यास मानसिक रित्या महिला सक्षम बनतात.
यावेळी नगसेविका शैला उफाडे, रत्ना शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर महिला व माता पालक यांनी कविता, नांवे घेणे, सादर केली. महिला शिक्षिका यांनी उपस्थित पाहुण्या व माता पालक यांचे हळदी कुंकू लावून औक्षण केले. त्याना शुभेच्छा पत्र, तिळगुळ, गजरा, ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महिला शिक्षकांनी सुंदर अशी रांगोळी काढली होती व फलक लेखन केले होते. या कार्यक्रमासाठी माता पालक, सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती. व्ही. बी. शिंदे यांनी तर आभार श्रीमती सरला कदम यांनी मानले.