महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारीख फिक्स.! निवडणूक आयोगाने दिली संपूर्ण माहिती...
![महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारीख फिक्स.! निवडणूक आयोगाने दिली संपूर्ण माहिती...](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_670e501a745eb.jpg)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून, २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. त्यानुसार आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी ही निवडणुका पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक खालील प्रमाणे...
1. निवडणुकीचं नोटिफिकेशन - दि. 22 ऑक्टोबर 2024
2. अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
3. अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
4. मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
5. मतमोजणी - 23 नोव्हेंबर
तर निवडणूक प्रक्रिया समाप्त - 25 नोव्हेंबर 2024
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. 9.63 कोटी मतदार असून 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. त्यामध्ये, 1.85 कोटी तरुण मतदार आहेत, यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. राज्यात 100 वर्ष पूर्ण करणारे मतदार 47,776 आहेत. तर, 85 वर्षापेक्षा अधिक वय 42 लाख 43 हजार, तर 6.36 लाख दिव्यांग आणि 6,031 तृतीयपंथी मतदार आहेत.