रस्ता दुभाजकावरील कुंड्या आणि झाडं झाली गायब.! नगरपरिषदेचं दुर्लक्ष...
![रस्ता दुभाजकावरील कुंड्या आणि झाडं झाली गायब.! नगरपरिषदेचं दुर्लक्ष...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e071c3ee4a7.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
भंडारा : शहरातील तुमसर खापा मार्गावरील रस्ता दुभाजकांकडे नगरपरिषद यंत्रानेचं दुर्लक्ष झाले असून, काही ठिकाणी दुभाजकांवर काटेरी झुडपे उगवली तर काही ठिकाणी कचराकुंडीसारखा त्याचा वापर होत असल्याचे दिसत आहे. तुमसर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे कार्य माजी नगराध्यक्षांनी "ग्रीन-तुमसर क्लीन-तुमसर" या संकल्पनेतून केले होते. त्यानुसार जुना बस स्थानक ते बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजक तयार करून, आकर्षक कुंड्या झाडे व पथदिवे लावून रस्ता सुशोभित केला होता.
भंडारा येथून तुमसर मध्ये प्रवेश करताच अल्हाददायक वातावरणाचा अनुभव देणारे हे दुभाजक होते. मात्र नगराध्यक्षांच्या कार्यकाळ संपला व नगरपालिकेच्या नियोजनाअभावी हळूहळू झाडे नष्ट झाली. काही दुभाजकांच्या काठांवर अपघात झाल्याने ते फुटून दगड बाहेर पडलेत. विखुरलेले दगड अद्याप शाबूत केले गेले नाही. लोंबकलेल्या झाडांच्या फांद्याही कापले गेले नाहीत. दुभाजकावर अनेक कुंड्या तुटून पडल्या असून, झाडे पाण्याअभावी सुकलेले आहेत. मात्र याकडे नगरपालिका यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.