दिंडोरीत नगरपंचायतीच्यावतीने संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण मतदार नोंदणी करीता विशेष शिबिरे आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदिप चौधरी यांनी दिली.
संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. शहरातील नागरिकांकडून दावे व हरकती, मतदार नोंदणीचे, मतदार यादीची दुरुस्ती,मयत मतदारांची नवे वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी करुन घेणेसाठी विशेष शिबिरे आयोजित केले आहे.
कायम स्थंलातरीत त्यांचेसाठी फॉर्म नं.७ त्याचप्रमाणे नविन नाव नोंदणी फॉर्म नं.६ भरुन घेणे आवश्यक आहे. सदर मोहिमेच्या दिवशी सर्व मतदार केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. त्याकरीता नगरपंचायत जन्म मृत्यु नोंदणी कर्मचारी यांचेकडुन मयतांचे मृत्यु दाखले प्राप्त करुन घ्यावे तसेच ज्यांचे मृत्यु दाखले उपलब्ध होणार नाही अशांच्या बाबतीत आयोगाने विहित केलेली कार्यपध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.याबाबत नागरिकांनी सहकार्य करून मतदार यादी दुरुस्ती बदल व नवीन नोंदणीसाठी सहभागी व्हावे असेही आव्हाहन मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे.