पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारीता करावी - डॉ. विठ्ठल लहाने
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख
लातूर : ६ जानेवारी १८३२ रोजी महाराष्ट्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ६ जानेवारी रोजी दर्पण दिन (पत्रकार दिन) साजरा केला जातो. लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०२४ रोजी दर्पण दिन व पत्रकार सन्मान सोहळा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रभारी प्राचार्य संजय गवई, उपप्राचार्य राजकुमार लखादिवे यांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मानपत्र, गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना डॉ विठ्ठल लहाने म्हणाले पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारीता करावी व समाजाचं प्रबोधन करावं असे सांगितले. तर बदलत्या काळानुसार पत्रकार बांधवांनी सोशल मीडिया चा पुरेपुर वापर करावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. आजच्या ब्रेकिंग न्यूज च्या जमाण्यात ही प्रिंट मीडियाची विश्वासाहर्ता कायम टिकून असल्याचे प्राचार्य संजय गवई यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाषचंद्र नाईक, जेष्ठ पत्रकार पी. आर. पाटील, वामन पाठक, महादेव डोंबे, राजकुमार सोनी, सतीष तांदळे, संदिप भोसले, रमेश शिंदे, संतोष सोनवणे, संगाप्पा स्वामी, विनोद चव्हाण, यशवंत पवार, शरद पवार, लिंबराज पन्हाळकर, शिवाजी कांबळे, नितिन चालक, अमरदिप बनसोडे, प्रशांत साळुंके, तुळशीदास शेळके, महादेव पोलदासे, संजीव कांबळे, राजकुमार काळे, चंद्रकांत पाटील, राजकुमार दाभाडे, हिराप्रकाश कांबळे, महेश गाडेकर, बाबुराव बोरोळे, संजीव पाटील, राम रोडगे, सलीम शेख, विद्यासागर पाटील आदींसह उपस्थित पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर, संस्थापक सचिव दत्तात्रय परळकर, संस्थापक कोषाध्यक्ष राजकुमार गुडाप्पे, नुतन जिल्हाध्यक्ष संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर डिगोळे, शहराध्यक्ष अमोल घायाळ आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण सुर्यवंशी, आभार संजय राजुळे तर सूत्रसंचलन गणेश परळे यांनी केले.