बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप गांगुर्डे तर सरचिटणीसपदी चंद्रकांत गांगुर्डे यांची निवड...

बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप गांगुर्डे तर सरचिटणीसपदी चंद्रकांत गांगुर्डे यांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील बुद्धविहारात नुकतीच भारतीय बौद्धमहासभेच्या बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष रितेश गांगुर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शाखेचे संस्कार उपाध्यक्ष प्रकाश जगताप,संरक्षण सचिव कृष्णाजी सोनवणे,भाऊलाल कटारे, कार्यालयीन सचिव चावदास भालेराव, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये तालुकाध्यक्षपदी प्रदीप गांगुर्डे,तर तालुका सरचिटणीसपदी चंद्रकांत गांगुर्डे  कोषाध्यक्षपदी मधुकर पगारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

पुढील कार्यकारणी, कार्यालयीन सचिव दगु सोनवणे,संस्कार उपाध्यक्ष किशोर सोनवणे,संस्कार सचिव सागर पगारे,सचिन बागूल,संरक्षण उपाध्यक्ष जयेश मोरे,संरक्षण सचिव रितेश गांगुर्डे,मनोज गवारे,पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत पगारे,पर्यटन सचिव विजय पगारे,हिरामण गायकवाड तर तालुका संघटकपदी अजित जाधव व सुरज पगारे यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिका-यांचा सत्कार संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप गांगुर्डे यांनी सांगितले की तालुक्यात संस्थेचे धम्मकार्य गतीमान आणि जोमाने करण्यासाठी विविध विवीध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. नुतन कार्यकारिणीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.