चाकणमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; गॅस चोरी करणाऱ्यांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त...
प्रतिनिधी – विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या धंद्यावर चाकण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गॅस चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी छापा टाकून आरोपींकडून तब्बल 49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात गॅस सिलिंडर, रिफिलिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे व इतर साहित्याचा समावेश आहे. हा अवैध व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा धोकादायक आणि बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.