सोलापुरात जिल्हा प्रशासनाच्या'वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक अभिवादन...

सोलापुरात जिल्हा प्रशासनाच्या'वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक अभिवादन...

NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे

सोलापूर : भारतरत्न, विश्वभूषण, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.! सोलापूरातील डॉक्टर आंबेडकर चौकात असलेल्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सारा भीमसागर लोटला आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा परिषदेच्या प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे,  जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता कटकधोंड, कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, कृषी विकास अधिकारी कुंभार, जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर व लेखाधिकारी राजगुरू यांची उपस्थिती होती.