खा. वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम आरोग्यासाठी; बारडकर यांच्याकडून श्री शीतला देवी चरणी महाआरती...

खा. वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम आरोग्यासाठी; बारडकर यांच्याकडून श्री शीतला देवी चरणी महाआरती...

प्रतिनिधी -  मनोज मनपुर्वे, नांदेड

मुदखेड तालुक्यातील बारड येथे खा. वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उत्तम व निरामय आरोग्यासाठी; कुलदैवत श्री शीतलादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली.

खा. चव्हाण साहेबांचे स्वास्थ्यात लवकरात लवकर सुधारणा व्हावी व पुन्हा चव्हाण साहेब जनतेत तत्परतेने रूजू व्हावेत यासाठी बारड पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री शीतला देवी चरणी प्रार्थना व आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार तथा स्वा. सै. साहेबराव बापू यांचे नातू ऍड संदिपराव देशमुख बारडकर, मुदखेड ता. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. प्रतापराव देशमुख बारडकर, प्रा.-संदीपकुमार देशमुख बारडकर, संजयराव मुलंगे, उपसरपंच संजय सावंत, माजी सरपंच श्रीनिवास महादवाड डोगंरगावकर, नर्सिंगराव आठवले, अनुराग बारडकर, किशोर पिल्लेवाड, डॉ आनंदा कांबळे, दत्ता कदम, वैभव कवळे, शंकर देशमुख, आनंदा पवार, दिगंबर वच्छेवार, तालुका उपाध्यक्ष दादाराव पुयड, नितीन भोसले, माधव आढाव, सुरेश आढाव यांच्या सह अनेक नागरिक महाआरती करिता उपस्थित उपस्थित होते.