दिडोरी येथे सरपंच संसदेचे आयोजन.!
![दिडोरी येथे सरपंच संसदेचे आयोजन.!](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c7583da028f.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद' आणि महाराष्ट्र शासन नाशिक विभागीय आयुक्त विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने दिंङोरी तालूका सरपंच संसदचे लवकरच आयोजन करण्यात येणार असून तहसीलदार मुकेश कांबळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांची भेट घेत नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे सरपंच संसदे'चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अचूक नियोजनासाठी 'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे'चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील,सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी दिंडोरी तालूका सरपंच संसद कार्यकारिणी पदाधिकारी यांची दिडोरी येथे नुकतीच महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की,उत्तर महाराष्ट्रातील एकूण ५४ तालुक्यात 'महाराष्ट्र राज्य तालुका सरपंच संसद' उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशाकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, 'एमआयटी, पुणे' शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष,'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट'चे प्रणेते व 'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे' चे संस्थापक राहुल कराड यांची ही संकल्पना असून नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्णजी गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात लवकरच 'दिंडोरी तालुका सरपंच संसदे'चे आयोजन करण्यात येत आहे.या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे. 'सरपंच संसदत कार्यक्रमात दिंडोरी उपविभागाचे प्रांतधिकारी आबासाहेब शिंदे,तहसीलदार मुकेश कांबळे व पंचायत समिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप,तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.
एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे'चे दिंङोरी तालुका अध्यक्ष गंगाधर निखाडे, तालुका समन्वयक माधवराव उगले,तालुका संघटक वसंतराव कावळे,तालुका सहसमन्वयक जीवन मोरे,तालुका सहसंघटक सुकदेव खुर्दळ, तालुका महिला समन्वयक सौ.ज्योती देशमुख आदी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.याप्रसंगी तालुक्यातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.