दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत मुक्कामी बस सेवा सुरू करावी.! विद्यार्थी व पालकांची मागणी
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत बस गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पालखेड कॉलनी, लोखंडेवाडी,राजापूर,जोपुळ धामणवाडी, येथून ते शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सातत्याने ये-जा असते.! परंतु, ही बस बंद केल्याने या शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असून, त्या विद्यार्थ्यांना शालेय प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे.
शैक्षणिक व आर्थिक झळ या विद्यार्थ्यांना सोसावी लागत आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत असल्याने या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असून याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन बंद पडलेली बस सेवा पूर्वरत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण विद्यार्थी व पालकांनी केली आहे.