BIG BREAKING : वनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू..
![BIG BREAKING : वनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू..](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c768046b8ca.jpg)
News15 मराठी बापु चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येथील खंडेराव डोंगर परिसरात विठ्ठल भिवा पोतदार या १६ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले.
यावेळी परिसरात असल्याने नागरिकांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली त्यानंतर सरपंच दत्तू भेरे यांनी याची तात्काळ दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या ठिकाणी प्रचारण केले असता त्यांनी या मुलाला तात्काळ दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामस्थांनी यावेळी हळहळ व संताप व्यक्त करून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.