पगार झाली मात्र दारु आणली नाही.! मित्रांनी केली मित्राची हत्या...

पगार झाली मात्र दारु आणली नाही.! मित्रांनी केली मित्राची हत्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील थेरगाव येथे मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर पगार झाली असतांना दारु सांगितल्यावर मित्राने नकार दिल्याने ही हत्या झाल्याचे समोर आलेय. सुरज कांबळे (वय 27) असं मयत युवकाचे नाव आहे.

सदर मयत युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बावधन ब्रिज खालील नाल्यात नागरिकांना दिसून आल्याने, घटना उघडकीस आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.! लखन जोगदंड, पंकज पाचपिंडे आणि सुरज कांबळे हे तिघेही मित्र होते. हे थेरगाव येथे दारू पिण्याकरिता एका मैत्रिणीच्या घरी बसले होते. मैत्रीला काही कारणास्तव बाहेर पाठवले आणि त्यानंतर; हे तिघेही दारू पिण्यासाठी बसले. सुरज कांबळे याचा पेमेंट झाला होता. तर याची माहिती त्या दोन मित्रांना होती. त्यामुळं दारू संपत आल्यानंतर सुरज'ला दारू आणण्यासाठी या दोन मित्रांनी आग्रह केला. परंतु, सुरजने त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतर लखन जोगदंड आणि पंकज पाचपिंडे यांनी सुरज कांबळे बरोबर वादीवाद सुरू केला. आणि आरोपींनी सुरज कांबळे'च्या गळ्यावर आणि मानेवर दोघांनी मिळून चाकूने सपासपा वार करत त्याची हत्या केली.

हत्या केल्यानंतर रिक्षाच्या साह्याने सुरज कांबळे याचं मृतदेह बावधन ब्रिज खालील नाल्यात आरोपींनी  फेकून दिला आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी पंकज पाचपिंडे याला CCTV च्या माध्यमातून पोलिसांनी काही तासातच अटक केली. त्याचा साथीदार लखन जोगदंड हा मुख्य आरोपी फरार असल्याने, वाकड पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्हीही आरोपी रेकॉर्डवरील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. या पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.