हाडोळती येथे मारहाणीत एकाचा मृत्यु. परस्पर विरोधी गुन्हे दाखल...

हाडोळती येथे मारहाणीत एकाचा मृत्यु. परस्पर विरोधी गुन्हे दाखल...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर 

अहमदपुर तालुक्यातील हाडोळती येथे मारहाण झाली त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सविस्तर वृत असे की, हाडोळती बस स्टॅड वर काचेची बाटली घेऊन मारहाण करून जखमी करतांना तेथील जमावाने त्याला पकडून मारहाण केली त्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

एका पार्टीतील तक्रारदार चंद्रभागाबाई नागोराव काळगीरे यांचा मुलगा मयत दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे यांना ११ जनांना माझा मुलगा मारहाण करून जखमी केले व हातपाय बांधून ठेवले. मला व माझ्या मुलाला ॲटोत बसवून सरकारी दवाखाना अहमदपूर येथे पाठविले पुढील विलाजकामी लातूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविले व तो मरण पावला यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या पार्टीचे बालाजी लक्ष्मण मुळके वय ५५ वर्षे रा.हाडोळती हा हॉटेलवर चहा पिण्यासाठी आलो असता बरेच लोक चहा पिण्यासाठी बसले होते  दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे रा हाडोळती हा दारूची बाटली फोडलेली व लेखंडी रॉड घेऊन आला व माझ्या मुलास बाटली हानत असतांना रॉडने माझा हात मोडून जखमी केले वैगरे वरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलिस विभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर करीत आहेत.