चाकूर येथे गोवंशाची कत्तल करणाऱ्या १० जनावर पोलीसांची कारवाई...

चाकूर येथे गोवंशाची कत्तल करणाऱ्या १० जनावर पोलीसांची कारवाई...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

चाकुर येथे उघड्यावर गोवंशाची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून.! पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेंड्डी यांच्या पथकाने धाड टाकून, १० जनावर कार्यवाही केली आहे. तर त्यात २ लाख ४७, ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पाटील नगर भागात उघड्यावर गोवंशाची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती मिळताच.! दि ३१ मे रोजी पहाटे ४ वाजता या ठिकाणी धाड टाकल्यानंतर सदरील ठिकाणी गोवंशाची हत्या करीत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अंदाजे ६ क्विंटल कत्तल केलेले गोवंश मास आणि ४ जिवंत गोवंश असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्याठिकाणी चारा पाण्याची सोय न करता; अतिशय क्रूरतेने बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

आरोपी अजमल सत्तार कुरेशी वय २७ वर्षे, सलीम जमाल कुरेशी वय ३४ वर्षे, तजमुल सत्तार कुरेशी वय ३२ वर्षे, सत्तार मोहम्मद याशिन कुरेशी वय ५२ वर्षे, अझर कुरेशी वय ३४ वर्षे, रौफ जमाल कुरेशी वय ३५ वर्षे सर्व राहणार आर. पी. पाटील नगर चाकुर आणि खालिद कुरेशी वय ३२ वर्षे, दाऊद कुरेशी वय २३ वर्षे, अयुब कुरेशी वय ४५ वर्षे, नयुब कुरेशी वय ३६ वर्षे हे सर्व राहणार लेंडी गल्ली चाकुर यांना ताब्यात घेऊन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, आरदवाड, रायबोळे, मरपल्ले यांनी ही कारवाई केली आहे, पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत.