आतंरवाली सराटी येथील सभेवरुन परत येणाऱ्या युवकांचा आपघाती मृत्यू.! मित्र गंभीर जखमी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव तुकाराम येथील दोन मित्र; दि. 14 रोजी आतंरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोटारसायकल गेले असता; सभा संपल्यानंतर दोन्ही मित्र परतत असताना दि. 14 ऑक्टोबर'च्या रात्री कळमनुरी तालुक्यातील सिंदगी घाटात मोटारसायकलचा आपघात झाला.
यामध्ये मंगेश संभाजी काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन काळे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मयत मंगेश यांच्या पार्थिवावर येळेगाव तुकाराम येथे दि. 15 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.