अहमदपूरचे कनिष्ट अभियंता बळीराम सोनकांबळे लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात...

अहमदपूरचे कनिष्ट अभियंता बळीराम सोनकांबळे लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर : येथील लघू पाटबंधारे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर कार्यालय मधील कनिष्ट अभियंता बळीराम सोनकांबळे लाच घेतांना लाच लुचपतच्या जाळात आडकले आहेत.

तक्रारदार  हे शासकीय नोंदणीकृत गुत्तेदार असून शासकिय कामाचे गुत्तेदारीचे काम करतात १५ वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी मधून ग्राम पंचायत पार ता अहमदपूर येथील पाईप लाईन व नळ कनेक्शन जोडणीचे काम तक्रारदार यांनी केले असून सदर काम पुर्ण झाल्यानंतर कामाचे प्रलंबित देयकासाठी ते दि ३१ / ०३ / २०२४ रोजी लघू पाटबंधारे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर कार्यालया मधील कनिष्ट अभियंता बळीराम पंढरीनाथ सोनकांबळे यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित देयक काढण्याचे कामासाठी म्हणून एकून तिस हजार रुपये लाचेची मागणी केली.

दि ३० / ०३ / २०२४ रोजी शासकिय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक क्र.१ यांनी ३०,००० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १५,००० रुपये आता व उर्वरित रक्कम देयक मिळाल्यानंतर स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम स्वतःचे कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.आरोपी क्र.२ पंडीत मच्छिंद्र शेकडे पद - खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम आलोसे क्र.१ बळीराम सोनकोबळे यांना देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.दोन्ही आरोपींना सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले आहे.

अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी संतोष बर्गे उपअधिक्षक लातूर तपास अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक लातूर हे करीत आहेत.