मोठी बातमी : खराबवाडी गावातील सारा सिटीत दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील गंठणची चोरी,अल्पवयीन आरोपीला अटक...!

मोठी बातमी : खराबवाडी गावातील सारा सिटीत दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील गंठणची चोरी,अल्पवयीन आरोपीला अटक...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी गावातील सारा सिटीतील गजबजलेल्या परिसरात रविवार(दि. २२) रोजी रात्री ९:२० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकी वरून येऊन एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिकावून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अल्पवयीन आरोपीस तात्काळ ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, रविवारी रात्री ९:२० वाजताच्या दरम्यान खराबवाडी गावातील सारा सिटीत रस्त्याने पिंटू शंकरलाल चौधरी(रा. सारा सिटी बी फेज)आपल्या दुकानाकडे जात असताना पाठीमागून अनोळखी दोन व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून येऊन त्यांनी महिलेच्या गळ्यात एक तोळ्याचे गंठण हिसकावून चोरून नेले होते. यावर महाळुंगे MIDC पोलीस व गुन्हे शाखा युनिट -३ ची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. 

वेळोवेळी सूचना करूनही दुकानदार, सोसायटी कमिटी किंवा इतर व्यावसायिक आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सिसिटीव्ही बसवत नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वरील प्रमाणे चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाली. यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या टीमने सीताफिने आरोपीचा पाठलाग करून एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. आरोपीच्या बाबत पुढील कार्यवाही सुरु असून या गुन्ह्यातून अजूनही या अल्पवयीन आरोपीनी कुठे चोरी केली आहे का? या घटनेचा सखोल तपास गुन्हे शाखा टीम व महाळुंगे MIDC पोलीस व तळेगाव पोलीस करत आहेत.