कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भाजपशी छुपे संबंध.! VBA प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप...

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भाजपशी छुपे संबंध.! VBA प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप...

NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, त्या अनुषंघाने राजकीय नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत. परंतु, आज एकेकाळी इंडिया आघाडीत सामील होणारा राज्यातील एक मुख्य विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनीच चक्क भाजप विरोधातील प्रमुख पक्षाच्या प्रदेशाध्यक्षकांवरच थेट आरोप केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यासोबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राज्यात काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ दोन जांगावर पाठिंबा हवा आहे. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार असल्याने नाना पटोलेंना प्रचंड दुःख झालं आहे, यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी का माघार घेतली. हे आता समोर येतंय. कारण त्यांना भाजपसोबत लढायचं नव्हतं. दरम्यान काँग्रेसमधल्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांचे छुपे संबंध भाजपच्या नेत्यांशी आहेत. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याच दुःख त्यांना होतंय. दरम्यान काँग्रेसमध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे स्पष्ट झालं. नाना फोटो आणि भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे. तसेच वंचितला मविआत का घेऊ नये? वारंवार नाना पटोलेंकडून व्यक्तव्य होतं होतं. आता त्यावरून स्पष्ट होतंय... वंचितनं महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असता तर; भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला असता. तेच नाना पटोलेंना नको होतं. त्यामुळे वंचितला बाहेर ठेवण्यात आलं. असा थेट आरोपी त्यांनी नाना पटोलेंवर केला आहे. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गंभीर्याने पाहावं असा आवाहनही आंबेडकरांनी केलं.