पॉर्न फिल्म शूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश.! मुद्देमालासह 18 जण ताब्यात...

पॉर्न फिल्म शूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश.! मुद्देमालासह 18 जण ताब्यात...

पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्रातील विद्येचे माहेर आणि सुसंस्कृत पुणे जिल्ह्यातील पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या; लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या आणि मळवली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरील पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा.! लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फिल्म अर्थात चित्रफीत बनवण्यासाठी लागणाऱ्या 6 लाख 72 हजार 620 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 29 मार्च रोजी पाटण गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या आर्णव व्हिला (ता. मावळ, जि. पुणे) या एका खाजगी बंगल्यात अश्लिल, नग्न व बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याची गोपनीय माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता; या छाप्यात पोलिसांना सदरच्या बंगल्यात संभोगाच्या बीभत्स चित्रफीत तयार करीत असलेली मंडळी रंगेहाथ मिळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून 5 महिला आणि 10 पुरुषांसह बंगला बेकायदेशीरपणे भाड्याने देणाऱ्या आणि तो चालवणारे 3 जण अशा एकूण 18 जणांना ताब्यात घेऊन चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.