तरुणीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी २२ वर्षानंतर पकडला...
![तरुणीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी २२ वर्षानंतर पकडला...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a0e4c43aa35.jpg)
प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वॉन्टेड असलेल्या आरोपीला भंडारा पोलिसांनी तब्बल २२ वर्षानंतर अटक केली आहे. आरोपी उमेश बाबुराव बनसोड (त्या वेळचे वय २१ वर्षे ) आता ४३ वर्षाचा आहे. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेशने २००३ मध्ये पिढीतील लग्नाचे आम्हीच दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिली. मात्र, तेव्हापासून उमेश फरार झाला. ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. दरम्यान जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या लेडी कॉन्स्टेबल लक्ष्मी कापगते यांना उमेश नागपुरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासोबत एल.सी.बी. पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोलकर यांनी तपास केला व दुर्गावती चौक, यादव नगर, गल्ली क्रमांक ७ मध्ये वास्तव्यास असलेल्या उमेश ला अटक केली.