चाकण परिसरातील वासूलीफाटा येथील २२ वर्षीय तरुण बेपत्ता...!

चाकण परिसरातील वासूलीफाटा येथील २२ वर्षीय तरुण बेपत्ता...!

News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वासुलीफाटा गावातील सत्यवान बबन ढमाले(वय-२२ वर्षे) तरुण ११ फेब्रुवारी २०२३ पासून बेपत्ता असल्याची फिर्याद महाळुंगे MIDC पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सत्यवान ढमाले या तरुणाला ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भावाने मोटार सायकलवरुन रिलायन्स कंपनी भांबोली येथे सोडले. त्यानंतर त्याचा भाऊ कामावर गेला. सकाळी त्याचा बेपत्ता असलेल्या तरुणाचा भाऊ सायंकाळी ६ वाजता घरी आल्यावर बघितले असता त्याचा भाऊ त्याला कुठे आढळला नाही. त्यानंतर बेपत्ता असलेल्याच्या भावाने सत्यवान बबन ढमालेच्या भावाने कंपनीत फोन करून विचारले असता त्याने दोन दिवसाची सुट्टी घेतल्याचे संगितले. त्यांनंतर त्याच्या भावाने त्याची नातेवाईक व इतरत्र चौकशी केली असता तो कुठे मिळून आला नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

बेपत्ता असलेल्या इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे:- नाव-समाधान बबन ढमाले, वय-२६ वर्ष, रा. वासुली फाटा. ता.खेड, जि. पुणे, रंग-गोरा, ऊंची- ५ फुट ७ इंच, अगाने- मध्यम, केस-बारीक, अंगात काळ्या रंगाचे जर्किंग आणि काळ्या रंगाची पॅंट घातली आहे.

वरील वर्णाचा कुणी इसम आपल्या परिसरात किवा गावात आढळला तर, महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याशी संपर्क करा असे आव्हान महाळुंगे MIDC पोलिसांनी केले आहे.