कळस बुद्रुक गावात मित्राच्या स्मृती प्रित्यार्थ शिवजयंती उत्साहात साजरी...!

कळस बुद्रुक गावात मित्राच्या स्मृती प्रित्यार्थ शिवजयंती उत्साहात साजरी...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : कळस बुद्रुक गावात मागील एक वर्षापूर्वी जिवाभावाचा मित्र अपघातात गेल्यानंतर कायम आपला प्रिय मित्र आपल्या स्मरणात राहावा  यासाठी कळस बुद्रुक गावातील मित्रपरिवाराने अजिंक्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.

मागील वर्षी अजिंक्य कातोरे हा जिवाभावाचा मित्र कायमचा सर्वांना सोडून गेल्याने आपल्या मित्राच्या आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी गावातील राहुल बालोडे, सागर संपत वाकचौरे, भूषण वाकचौरे, कुणाल वाकचौरे,अजित वाकचौरे, नकुल ढगे,प्रभात चौधरी, ऋषिकेश रनशूर, सूरज गवळी, कृष्णा शिर्के, जय शिर्के, प्रवीण हासे, विकास वाकचौरे यांच्या संकल्पनेतून गावात काहीतरी उपक्रम सुरू करण्याचा ध्यास या मित्रपरिवाराने घेऊन त्यातून अजिंक्य शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने दिनाक १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या निमित्ताने पत्रकार अमोल शिर्के, ईश्वर वाकचौरे यांच्या सहकार्याने खिचडी वाटप करण्यात आले. या उपक्रमाला अकोले विधानसभेचे आमदार डॉ.किरण लहामटे व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट देऊन कौतुक केले.

  

आजच्या शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कळस बुद्रुक गावातील प्राथमिक शाळा व कळसेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सांकृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून ग्रामस्थांची मने जिंकली. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना विनायक पांडे यांनी खाऊ वाटप करून उपक्रमाचे कौतुक केले. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अजिंक्य शिवजयंती उत्सव समितीकडून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शाळेचे शिक्षक व पालक उपस्थित होते. अजिंक्य शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षक व कळसेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कळस बुद्रुकचे गावाचे सरपंच राजेंद्र गवांदे, माजी उपसरपंच ईश्वर वाकचौरे, पोलिस पाटील गोपीनाथ ढगे, कळस बुद्रुक सोसायटीचे माजी संचालक शांताराम वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्या संगिता चौधरी, पत्रकार सागर शिंदे, पोलिस हवालदार लहामगे, पोलिस हवालदार गवारी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक कर्पे सर यांनी केले.