तामसा येथील बारालिंग देवस्थानची 150वर्षाची भाजी भाकरीची परंपरा...

तामसा येथील बारालिंग देवस्थानची 150वर्षाची भाजी भाकरीची परंपरा...

प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड

नांदेड :- हदगाव तालुक्यातील तामसा शहरा लगत असलेल्या बारालिंग देवस्थानात मागील 150 वर्षापासून संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी भाजी भाकरीचा महा प्रसाद वाटप करण्याची प्रथा चालु आहे.दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढत असल्याने यावर्षी तब्बल 250 क्विंटल सर्व प्रकारच्या पाले भाज्या भक्त मंडळीकडुन संकलीत करुन,स्वच्छ धुवून त्याची भल्या मोठ्या कढयांमध्ये आरोग्यदायी अशी भाजी करण्यात आली.या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तेल मसाले काहीही न वापरता केवळ हीरवी मीर्ची,लाल चटणी व मिठ येवढंच टाकुन ही भाजी केली जाते.या सोबत लागणाऱ्या भाकरी देवस्थानतर्फे व बऱ्याच गावामधुन भक्तांतर्फे टेंपो भरुन आणून दिल्या जातात.

हा भव्य दिव्य भाजी भाकरीचा कार्यक्रम काल दिनांक 16 रोजी सकाळी 10 पासुण ते सायंकाळ पर्यंत चालु होता.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.मुरमुरे यांच्या पुढाकारातुन भव्य रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकरांसह सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावून भाजी भाकरीच्या प्रसादाचा आनंद लुटला.हदगाव येथील महादेव मंदीरातही 15 क्विंटल ज्वारीच्या भाकरी व 25 क्विंटल भाजीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.