जानोरी शाळेतर्फे सीडबॉल उपक्रम...

जानोरी शाळेतर्फे सीडबॉल उपक्रम...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरीच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांतर्फे बाणगंगानदी काठावरील परिसरात सीडबॉल लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

दप्तर मुक्त आनंददायी शनिवारच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम घेण्यात येतात.इको क्लब अभियान अंतर्गत उपक्रमातीलच एक उपक्रम म्हणजे सीडबॉल बनवणे.पर्यावरणाला मदत करणे.झाडे लावा,झाडे जगवा ह्या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये बी रुजवणे व झाडांची काळजी घेणे,हा संस्कार शाळेतूनच मिळतो.ह्यासाठी मनिषा गायकवाड यांच्या संकल्पनेतील सीडबॉल हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया आंबा, जांभूळ, गुलमोहर,चिंच,पपई या झाडांच्या बिया जमवल्या.शाळेत माती आणून मातीत शेणखत एकत्रित करून त्यात बिया टाकून सीडबॉल बनवण्यात आले.पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता बिजांकुरण करण्यासाठी गावातील रिकाम्या जागेत  बानगंगा नदी परिसरातील रिकाम्या जागेत विद्यार्थ्यांनी स्वतः सिडबॉल टाकून बिजांकुरणाचा आनंद घेतला. 

या उपक्रमात शाळेतील शिक्षिका प्रिया वरोडे तसेच लीना गोसावी,प्रमिला कापडणीस,मंगला ठाकरे,मंदा पिंपळे,व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार  यांचे सहकार्य लाभले.