तहसीलमध्ये आज महत्वपूर्ण बैठक.! राजकीय नेत्यांनी बैठकीस उपस्थित राहावे - श्री. शिंदे

तहसीलमध्ये आज महत्वपूर्ण बैठक.! राजकीय नेत्यांनी बैठकीस उपस्थित राहावे - श्री. शिंदे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : मतदान केंद्राचे प्रामाणिकरन व सुसूत्रीकरण करणे बाबत आज सर्व राजकीय पक्षांची बैठक; दिंडोरी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त या बैठकीस सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिंडोरी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.

निवडणूक अधिकारी नाशिक यांनी मतदान केंद्राचे प्रामाणिककरण व सुत्रीकरण बाबत राजकीय पक्षाची बैठक आयोजित करणे असे आदेश दिले असून, त्या अनुषंगाने मतदान नोंदणी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक आज (दि. १२) सकाळी ११ वा. तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. बैठकी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.