पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना सन्मानचिन्ह पदक जाहीर...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : दिंडोरी येथे कार्यरत असणारे दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी अनेक ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक गुन्ह्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना आपला इसका दाखवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले .