वलखेड येथे दि.१३ रोजी पीरबाबा यात्रोत्सव...
![वलखेड येथे दि.१३ रोजी पीरबाबा यात्रोत्सव...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_66168cf9ae34e.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे शनिवार दि.१३ एप्रिल रोजी पीरबाबा यात्रा होत असून यात्रेच्या दिवशी गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वलखेड येथील यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीयांची यात्रा हिंदू मुस्लिम हे एकत्र येत ही यात्रा साजरी करतात पीरबाबा मंदिराची रंगरंगोटी करून मंदिराभोवती विद्युत रोषणाई करून सर्वत्र सुशोभीकरण करण्यात आले आहे.यात्रेमध्ये खाद्यपदार्थाची दुकाने,खेळण्याची दुकाने,कटलरीची दुकाने,मिठाईची दुकाने,रहाट पाळणे आदी विविध दुकाने येणार असून सायंकाळी संदल निघते यात्रेच्या दिवशी नवीन गव्हाच्या पोळ्या करून त्याचा मलिदा बनविला जातो त्याचा नैवेद्य हा देवाला अर्पण केला जातो एका ताटामध्ये हा नैवेद्य,अगरबत्ती, फुले,नारळ असे प्रत्येक घरातील एक माणूस हा नैवेद्य घेऊन संदल मिरवणुकीत सामील होतो देवाला नैवेद्य अर्पण केला जातो व भाविक नारळ फोडतात त्यानंतर सायंकाळी ८ वा.संदल मिरवणूक निघते गावात हनुमान मंदिरापासून संदलाची वाजत गाजत मिरवणूक निघून पूर्ण गावात मिरवून पीरबाबाच्या मंदिरात येऊन तेथे पूजा विधि होणार आहे.
दुपारी पाच ते दहा वाजेपर्यंत यात्रा उत्सव होऊन रात्री १० वा. लोकनाट्य तमाशाचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी पंच कमिटीमध्ये कैलास शिंदे,पप्पू शिंदे,हिरामण पाटील,युवराज शिंदे,शंकर चारोस्कर, शंकर शिंदे,विलास गांगुर्डे,योगेश गामने,सुनील चारोस्कर आधी प्रयत्नशील असून भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.