अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी...

NEWS15 प्रतिनिधी - तिरोडा 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दि.29जून रोजी रात्री; तिरोडा तुमसर मार्गावरील नवेगाव मोहरान ढाब्याजवळ घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार; काल रात्री (दि. 29 जून) 10 वा. अज्ञात वाहनाने तिरोडा तुमसर मार्गावरील नवेगाव मोहरान ढाब्याजवळ सायकलसवार कामावरुन घरी परत असतांना; मुंडीकोटा येथील रहिवाशी अजय नेवारे वय  ३८ यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये सायकलस्वारला गंभीर दुखापत झाली असुम, उपचारासाठी शासकीय रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. नंतर पुढच्या उपसारासाठी खाजगी रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकूर्ती ठीक आहे. अशा अनेक घटना गोंदिया जिल्हा प्रवेशद्वारावरच नवेगाव ते तिरोडा यादरम्यान खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे, वाहन चालकांनी तसेच प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शासनाने प्रशासनाने यादरम्यान काही उपाययोजना करता येतील का? यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.