निलंगा येथे बुथप्रमुख व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान संपन्न...

निलंगा येथे बुथप्रमुख व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी

लातूर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार; निलंगा शहरात शिवसेना (शिंदे गट) लातूर  जिल्हा प्रमुख  गोपाळ माने व  उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील मुख्यमंत्री जणकल्याण कक्ष जिल्हा समन्वयक विष्णू बेडगे  यांच्या नेतृत्वाखाली २५० सदस्य नोंदणी करण्यात आली आहे.

 शहरातील जिजाऊ चौकात हा सदस्य नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. स्व. हिंदू-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालून शिवदुत, बुथप्रमुख व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख भगवान जाधव, तालुका संघटक अॕड. सुगंधा जगताप, सविता गायकवाड, निलंगा बाजार समिती संचालक विक्रम पाटील आदि उपस्थित होते.