शेतात राहणाऱ्या कुटुंबाला तलवार आणि पिस्तूलचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटलं.! महागाव तालुक्यातील घटना...

शेतात राहणाऱ्या कुटुंबाला तलवार आणि पिस्तूलचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटलं.! महागाव तालुक्यातील घटना...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, महागाव

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियाच्या शेतात आज दिनांक 9 जून रोजी मध्य रात्री सव्वा बारा वाजता 5 ते 6 अज्ञातांनी तलवारीचा व पिस्तूल धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापुस  विकलेले आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली रक्कम जवळपास 85 लक्ष रुपये नगदी व घरी असलेल्या दोन बहिणीच्या अंगावरील अंदाजे 15 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एम जाधव, एपीआय सरकटे, कर्मचारी पेंढारकर, सुहास कायटे, शेख वसीम हे करत आहे.