नवस फेडण्यास जाणाऱ्या वाहनाचा अपघात.! ६ ठार दोन बालकांसह अन्य गंभीर...

नवस फेडण्यास जाणाऱ्या वाहनाचा अपघात.! ६ ठार दोन बालकांसह अन्य गंभीर...

एका छोट्या पुलावरून जाणारा भरधाव हॅपे क्रमांक एम एच 29 31 72 हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात चार जण घटनास्थळी तर दोघेजण उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटात घडली असून दोन बालकाची प्रकृती गंभीर आहे तर चार जखमींवर पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे ही घटना 16 तारखेला दुपार दरम्यान घडली असून हे सर्व जण नवस फेडण्यासाठी पोहरादेवी जवळील उमरी येथे जात होते.

या अपघातात पार्वती रमेश जाधव वय 52 वर्ष राहणार वसंतपूर, ज्योतीबाई नागा चव्हाण वय 50 वर्ष राहणार धुंदी, उषा विष्णू राठोड वय 45 वर्ष राहणार धुंदी, लिलाबाई वसराम चव्हाण राहणार सिंगरवाडी, गणेश वसराम चव्हाण वय 62 वर्ष राहणार जवाहर नगर, सावित्री गणेश राठोड वय 40 वर्ष हे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर काही जखमींना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात पाठवले आहे तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी किरण मुक्कावार, पुसद यवतमाळ