NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने 17 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या...

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने 17 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या...

NEWS15 प्रतिनिधी -  साहिल रामटेके

गोंदिया : नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीने थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना; गोंदियाच्या आमगाव शहरात घडली असून, एका 17 वर्षीय मुलीने, साडीने पंख्याला गडफास  लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कु. सलोनी गौतम (वय 17 वर्ष) या मुलीने नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून साडीने पंख्याला गडफास  लावून आत्महत्या केली आहे. सलोनी'ला नीट परीक्षेत 100 च्या आत मार्क मिळाले होते. तर याच नैराशमूळ तिने रात्रीच्या सुमारास 3:30 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे यावरून स्पष्ट होते, आणि NEET बोर्डानेसुद्धा दिवसाने रिजल्ट दिलेलं चांगलं असेल जेणेकरून मुलांवर पालकांना लक्ष देण्यास मदत होईल,अशी मागणी नागरिक करत आहेत. उच्च स्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आलं असून, या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.