सांगवीतील त्या बेपत्ता तरुणीचा.! लोहगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह....

पुणे प्रतिनिधी -
सांगवी येथील बेपत्ता 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. 20) तिचा मृतदेह घेरेवाडी परिसरातील झाडाझुडपातून बाहेर काढला आहे.
सदर मृत तरुणीचे नाव मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय 21, रा. सांगवी) असे आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार; मंगळवारी सकाळी मानसी कॉलेजसाठी घरातून निघाली होती. तर ती 18 मार्च 2025 रोजी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती. सकाळी 8:56 वाजता लोहगडच्या तिकीट केंद्रावरील सीसीटीव्हीमध्ये ती एकटी दिसली होती. मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता.
तर मानसी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तिचा शोध सुरू केला. लोहगड परिसरात तिचा ठावठिकाणा असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि नातेवाईकांनी शोधमोहीम राबवली. शेवटी लोहगडाच्या पायथ्याशी नवग्रह मंदिराजवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला.
प्रथमदर्शी ही घटना गडावरून पडल्याने मृत्यू झाला असल्याचे दिसत असून, मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता, याचा तपास सध्या पोलीस करत आहे.