बेदाणा दरवाढीची शेतकऱ्यांना आशा? सणांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अपेक्षा...

बेदाणा दरवाढीची शेतकऱ्यांना आशा? सणांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अपेक्षा...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : यावर्षी  नाशिक जिल्ह्यात बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलेले दिसत असल्याने, आवक आणि उठावही कमी अधिक होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असल्याने बेदाणा उत्पादकांना थोड्या प्रमाणात दिलासा जरी मिळत असला तरी; यापेक्षाही बेदाण्याला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 4 महिन्यात रक्षाबंधन, श्रावण, गणपती, गोकुळाष्टमी, नवरात्र व दसरा दिवाळी हे सन असल्याने; या सणांच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची खरेदी पंधरा ते वीस दिवस अगोदर केली जाते. त्यामुळे बेदाणे व्यापारी आपली भूमिका पार पाडण्यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत.

सुरुवातीच्या काळात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री करण्याचे थांबवले होते. मात्र आता शेतकऱ्यांनी सण उत्सव तोंडावर आल्यामुळे शेतकरी सणानिमित्त बेदाणा विक्रीचे नियोजन करू लागले आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर बेदानाच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

यावर्षी बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे शिवाय दरात चढउतार होत आहे त्यामुळे थोडी नाराजी वाटते त्यामुळे विक्री थांबवली परंतु आता सणांच्या पार्श्वभूमीवर दर चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे.